आता बेरोजगारांच्या खात्यात सरकार पैसे जमा करणार, केंद्रीय कामगारमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली – तुमच्या-आमच्या खात्यात १५ लाख रुपये कधी जमा होणार याची सर्व जण वाट बघत असले तरी नोकरी गमावून बेरोजगार झालेल्यांच्या खात्यात मात्र केंद्र सरकार पैसे जमा करणार आहे. ही फेक न्यूज नाही. खात्रीशीर माहिती आहे आणि ती दस्तुरखुद्द केंद्रीय कामगारमंत्री संतोष गंगवार यांनीच जाहीर केली आहे. कर्मचारी विमा अर्थात ‘एसिक’ अंतर्गत येणा-या सर्व कर्मचा-यांसाठी ही खूशखबर आहे! भाजप सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर देशातील प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होण्याची बोंब झाली होती. त्यानतंर आतापर्यंत सोशल मीडियापासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियापर्यंत सर्व स्तरावर भाजपविरोधी पक्षांनी या १५ लाखांवरून भाजपला घेरले आहे. ते १५ लाख रुपये राहू दे बाजूला, आता बेरोजगार कर्मचाऱयांच्या खात्यात केंद्र सरकार पैसे जमा करणार आहे.

खासगी कंपनीतील कर्मचा-यांनाही खूशखबर

खासगी कंपनीतील कर्मचाऱयांची झोळीही सरकारने भरली आहे. त्यांना कामावरून केले किंवा इतर काही कारणास्तव नोकरी गेली तरी त्यांना तीन महिन्यांचा पगार मिळणार आहे. मृत्यू झाल्यास कर्मचाऱयाच्या कुटुंबीयांना १५ हजार रुपये याशिवाय ‘एसिक’अंतर्गत येणा-या कर्मचा-याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला १५ हजार रुपये सरकार देणार आहे. ही रक्कम याधी १० हजार रुपये होती. त्यात ५ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

‘अटल विमा कल्याण’ योजनेतील व्यक्तीला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उपचाराचा लाभ घेण्यासाठीची मर्यादाही कमी करण्यात आली आहे. सुरुवातीला या योजनेची मर्यादा एक वर्ष होती. ती आता १५६ दिवसांवर म्हणजेच सहा महिन्यांवर आणण्यात आली आहे.

काय आहे ही योजना?

बेरोजगारांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी सरकारने नवी ‘अटल विमा व्यक्ती कल्याण’ योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार नोकरी गमावलेल्यांना नवी नोकरी मिळेपर्यंत मधल्या काळात सरकार पैसे देणार आहे. हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील. कर्मचारी विमा योजनेतील म्हणजेच ‘एसिक’ अंतर्गत येणाऱया कर्मचाऱयांनाच हा लाभ मिळेल.

पीपीएफचा व्याजदर ८ टक्के

केंद्र सरकारने अल्पबचत खात्यांतील गुंतवणुकीवरील व्याजदरात ०.४ टक्के अशी भरघोस वाढ केली आहे. या निर्णयामुळे पीपीएफ, एनएससी (राष्ट्रीय बचत पत्र) आणि किसान विकास पत्रांत गुंतवणूक करणारे छोटे गुंतवणूकदार आणि नोकरदारांना मोठा दिलासा लाभणार आहे. पीपीएफ खात्यांना ८.० टक्के व्याजदर दिला जाणार आहे. नवे सुधारित व्याज दर १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१८ या तिमाहीसाठी लागू राहतील. सुकन्या समृद्धी खात्यांना ८.५ टक्के तर बचत खात्यांना चार टक्के व्याजदर मिळणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email