आता धोकादायक इमारतीत सुरु होणार नवीन शिधावाटप कार्यालय……

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.२३ – इमारत धोकादायक झाल्याने पोलीस ठाणे स्थलांतरीत करण्यात आले. मात्र याच इमारतीत शिधावाटप कार्यालये सुरु होणार आहे. या प्रशासनाच्या परस्परविरोधी अशा या निर्णयाने शिधावाटप कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात टाकल्यात आला आहे.पश्चिमेकडील स्टेशनसमोरील या इमारतीत शिधावाटप कार्यालय येत्या २६ तारखेपासून विष्णूनगर पोलीस ठण्याच्या जागेत हलवण्यात येत असून सध्या त्याची तयारी सुरु आहे.

सदर कार्यालय धोकादायक इमारतीत हलवण्यात येत असल्याची तक्रार  नागरिकांनी केली आहे. या जागेत १९८९ पासून विष्णूनगर पेालीस ठाणे होते ही वस्तू धोकादायक झाल्याने रिकामी करुन आनंद नगर येथे हलवण्यात आले आहे अशा धोकादायक इमारतीत आता शिधावाटप कार्यालय हलवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत असून अगोदरचे शिधावाटप कार्यालय पाणी भरते म्हणून त्रासदायक होते. आता धोकादायक इमारतीत शिधावाटप कार्यालय हलवण्यात येत असल्याने नागरिकांची व कर्मचाऱ्यां आगीतून नीफोफाटयात अशी अवस्था होणार आहे.

 

‘ह`प्रभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन वर्षापूर्वी महापालिकेने विष्णूनगर पोलीस ठाण्याची इमारत धोकादायक जाहीर केली होती व तीचे स्ट्रक्चरल ऑडिट पण करण्यात आले होते. मात्र त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही आता  जेथे मैदानाजवळ असलेले शिधावाटप कार्यालय गेली ४० वर्षे बैठया जागेत होते पावसाळयात तेथे पाणीसाठत होते याचा कर्मचार्याना व नागरिकांना त्रास होत होता शिवाय या जागेचे मालक परिचारक यांनी वांरवार राज्य शासनाकडे जागेचे भाडे वाढवून देण्याची मागणी केली होती.

त्यामुळे त्यानी कार्यालय जागा रिकामी करण्याची नोटीस दिली होती. अखेर ही जागा आता रिकामी करण्यात येत असून शिधावाटप राज्यमंत्री व स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण व राज्य शासन यांच्या निधीतून सध्या काम करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. विष्णूनगर पोलीस ठाण्याची इमारत तळ अधिक दोन मजली असून दुस-या मजल्यावर डोंबिवली ग्रंथसंग्रहालय आहे शिधावाटप कार्यालयासाठी १२०० चौ मी जागा असून पश्चिमेला सुमारे १७ हजार शिधावाटप धारक आहेत. तर सुमारे १५ कर्मचारी आहेत. या संदर्भात मालमत्ता विभागाचे अधिकारी अमित पंडित यांना विचारले असता त्यांनी ११ महिन्याच्या करारावर शिधावाटप कार्यालयासाठी जागा दिल्याचे मान्य केले व सध्या बाजारभावाप्रमाणे भाडे आकारले जाईल असे सांगीतले. ही जागा धोकादायक आहे हे माहित नाही अशी कबूली त्यांनी दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email