आतंरराष्ट्रीय क्रिकेट सट्टेबाजाचा कल्याण पोलिसांनी केला पर्दाफाश
(श्रीराम कांदु)
शहराच्या पश्चिमेतील खडकपाडा पोलिस व कल्याण गुन्हे शाखा यांनी संयुक्त कारवाई करीत गांधारी परिसरातील महावीर व्हॅली या उच्चभ्र इमारतीमध्ये छापा टाकून तीन जणांना अटक केली आहे. हे तीन जण आंतरराष्ट्रीय क्रीकेट सट्टा चालवित होते. या ठिकाणी ऑनलाईनद्वारे क्रिकेटवर सट्टा सुरु होता. काल इंडिया श्रीलंका ही टी-२० क्रिकेट सामना सुरु असताना पोलिसांनी छापा टाकला. तेव्हा हे तिघेही क्रीकेट सट्टय़ात गुंतले होते. या तिघांची नावे हिरामल तलरेजा, त्याचा भाऊ मुकेश तलरेजा आणि हिरामलचा मुलगा अनिल तलरेजा असे आहे. हे तिघेही उल्हासनगरातील राहणारे आहेत. त्यांचा म्होरक्या दुबईत बसला आहे. एका विशेष वेबसाईटचा वापर करुन हा सट्टाबाजार सुरु होता. पोलिसांनी अटक आरोपींकडून एक लाखाची रोकड, काही लॅपटॉप,महागडे मोबाईल असा तीन लाख २९ हजारचा ऐवज जप्त केला आहे. उल्हासनगर हा क्रिकेट सट्टेबाजांचा अड्डा असून त्यांनी आत्ता कल्याणच्या उच्चभ्र वस्तीतून हा सट्टा सुरु केला आहे. इतक्या माेठया उंची इमारतीत सट्टेबाजांना काेणी घर दिले हाेते. त्यांनी ते भाड्याने घेतले की, त्यांचे स्वतःचे हाेते. याचा पाेलिस तपास करीत आहेत. साेसायटीत सट्टा चालते याची जरा देखील कल्पना साेसायटीमध्ये राहणाऱ्यांना अजिबात नव्हती. पाेलिसांना बातमीदाराच्या माध्यमातून बातमी मिळाली हाेती. पाेलिसांची खबर पक्की ठरली. त्यांनी महावीर व्हॅलीत छापा टाकला तेव्हा तिघे आराेपी पाेलिसांच्या जाळ्यात सापडले.
Please follow and like us: