आज श्री स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा जन्मदिवस

आज १८ फेब्रुवारी…अर्थात श्री स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा जन्मदिवस.१८ फेब्रुवारी १८३६ रोजी बंगाल येथील कामारपुकुर येथे त्यांचा जन्म झाला.त्यांचे नाव गदाधर चटोपाध्याय.त्यांच्या वडिलांचे नाव खुदीराम तर मातेचे नाव चन्द्रमणी.कलकत्ता येथील दक्षिणेश्वर या कलिमातेच्या मंदिरात ते पुजारी होते.त्यांच्या भक्ती बद्दलच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत.स्वामी विवेकानंद यांचे गुरु अशीही त्यांची ओळख आहे.त्यांना अवतार वरिष्ठ म्हणूनही संबोधले जाते.सर्व धर्म समभाव ही त्यांची प्रमुख शिकवण होती.स्वामी विवेकानंद यांचे शिकागो येथील सर्वधर्म परिषदेतील यशामागे स्वामी रामकृष्ण परमहंस यांचीच शिकवण कार्य करत होती.श्री स्वामी रामकृष्ण परमहंस यांना त्यांच्या जन्मदिनी शतश: वंदन!

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email