आज रात्री दिसेल शतकातील सर्वात मोठं खग्रास चंद्रग्रहण
मुंबई दि.२७ -आषाढ पौर्णिमेच्या रात्री म्हणजे आज या शतकातील सर्वात मोठं खग्रास चंद्रग्रहण सर्वांना पाहता येणार आहे. आज रात्री पृथ्वीच्या सावल्यांचा खेळ सर्वांना पाहायला मिळणार आहे. पृथ्वीच्या सावलीतून चंद्र पूर्णपणे जात असल्याने या ग्रहणाला खग्रास चंद्रगहन म्हंटले जाते. १ तास दीड मिनिटे इतकी चंद्राची खग्रास अवस्था असणार असून आज रात्री ११.५४ मिनिटांनी हे ग्रहण सुरु होणार आहे. हे ग्रहण भारताप्रमाणेच संपूर्ण आशिया खंड, अंटार्टिका, रशियाचा काही भाग, आफ्रिका, युरोप आणि दक्षिण अमेरिकेचा काही भाग येथून दिसणार आहे. रात्री ११.५४ वाजता ग्रहणास प्रारंभ होईल. उत्तररात्री १ वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीस प्रारंभ होईल. उत्तररात्री २.४३ वाजता खग्रास स्थिती समाप्त होईल आणि उत्तररात्री ३.४९ वाजता ग्रहण सुटेल.