*आज राज ठाकरे यांची ठाण्यात जाहीर सभा; बंदोबस्तासाठी पोलीसांसह आरपीएफएफच्या तुकड्या तैनात*

( तेजस राजे )

मनसे आणि फेरीवाले यांच्या वादानंतर ठाण्यात मनसैनिकांना झालेली अटक आणि जामीन प्रकरणानंतर झालेला परवानगी नाकारण्याचा वाद, तसेच फेरीवाल्यांच्या मुद्यावरून मनसेने छेडलेल्या आंदोलनाला पोलिसांनी कोटींचा जामीन देण्याचा फतवा जारी केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे संतप्त झाले.

त्यानुसार, सरकार विरोधातील भडास काढण्यासाठी मनसेची ठाण्यात आज सांयकाळी जाहीर सभा होणार आहे. सरकार विरोधात मनसे मैदानात उतरण्याची चिन्हे असून याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एलफिस्टन रोडवरील अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फेरीवाल्यांना १५ दिवसांत जागा मोकळी करण्याची धमकी दिली आणि त्यानंतर झालेल्या आंदोलनात जवळजवळ सर्वच रेल्वे स्थानके मोकळी झाली. सर्वसामान्य नागरिकांनी याचे कौतुक केले. सर्व रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांना मनसेने हुसकावून लावल्याने पुन्हा एकदा मनसे चर्चेत आली.

मात्र, फेरीवाल्यांना हुसकावल्याप्रकरणी तसेच, मारहाण केल्याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी मनसे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह सात मनसैनिकांना नोटीस बजावून एक कोटींचा व २५ लाखांचा जामीन देण्याचा बडगा उगारला यातूनच मनसे आणि पोलीस संवाद झाल्याने लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जर आंदोलन करायला लागले तर आमचे काय चुकले अशी भूमिका मनसेने घेतली आणि या प्रकारातून मनसे आणि पोलिसांमध्ये वाद झाला आणि त्याचे पर्यवसान ठाण्यात राज ठाकरे यांची सभा लागली मात्र ठाणेनगर आणि नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सभेची जागा असल्याने आणि परवानगी नसल्याने परवानगी मिळवण्यासाठी मनसेे कार्यकर्ते हे प्रयत्नशील होते.

दरम्यान सोमवारी मनसे पदाधिकारी आणि पोलीस वरिष्ठ अधिकारी यांची एक बैठक झाली. याच दिवशी सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेे यांनी ठाण्यात येऊन मनसेेप्रमुख राज ठाकरेे यांच्या जाहीर सभेच्या जागेची पहाणी केली.

अखेर, १८ तारखेला होणाऱ्या जाहीर सभेसाठी डॉ. मूस मार्ग म्हणजेच गडकरी रंगायतन समोरील रस्त्यावरील जागेची निवड करण्यात आली असून मनसेकडून दाखल केलेला प्रस्ताव पोलीस दरबारी मान्य करण्यात आला. या सभेला आधी परवानगीच मिळत नव्हती बाळा नांदगावकर, अमित ठाकरे या सर्वांनी सभेसाठी प्रयत्न केले पण शेवट तडजोडीनंतर सभेला परवानगी मिळाली.

आता ही सभा गडकरी रंगायतन जवळ आज सांयकाळी साडे सात वाजल्यापासून सुरु होणार आहे. यासाठी जय्यत तयारीही सुरु आहे. या सभेसाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला असून कोणतीही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस आधी पासूनच प्रयत्न करत आहेत.

आज ठाणे पोलीस आणि आरपीफएएफच्या तुकड्याही बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. तसेच या सभेचे पोलिस व्हिडीओ चित्रण करणार आहेत .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email