आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे बंद

बुधवारी 25 जुलैला मुंबई बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या शिवाय ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही बंद पाळण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून करण्यात आली. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी हौतात्म्य पत्कारलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारीबाबत मराठा समाजाच्या भावना दुखावणारे आणि समाजाला बदनाम करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्या निषेधाचा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला. या बैठकीत राज्यातील अन्य भागाप्रमाणे मुंबईतही बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. आपल्या वक्तव्यांप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागून राजीनामा द्यावा, मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने मेगा भरती स्थगित ठेवावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी राज्यात मराठा समाजाचे आंदोलन तीव्र झाले आहे. औरंगाबाद येथे आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या आंदोलकाने जलसमाधी घेतल्याने आंदोलनाचा वणवा राज्यभर पसरला आहे. मंगळवारी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी न झालेल्या मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईत बुधवारी मराठा क्रांती मोर्चाने बंदची हाक दिली आहे. संपूर्ण शांततेत बंद पाळण्याचे आवाहन करताना मराठा समन्वकांनी शाळा, कॉलेजेस, सार्वजनिक वाहतूक, व्यापारपेठा बंद ठेवण्याची विनंती करण्यात आलेली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email