आज पुन्हा पेट्रोल २८ पैसे तर डिझेल १९ पैसे प्रतिलिटरने महागलं
आज पुन्हा पेट्रोल २८ पैसे तर डिझेल १९ पैसे प्रतिलिटरने महागलं. यामुळे सामान्यांच्या अडचणीत आणखी भर पडल्याने संताप व्यक्त होतोय. ऐन सणासुदीत पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचे चटके जनतेला सहन करावे लागत आहेत. दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८९.२९ रुपये तर डिझेल ७८.२६ रुपये प्रतिलिटर इतकं झालं आहे. दिल्लीतही पेट्रोल, डिझेलचे भाव वाढलेत. दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर २८ पैसे तर डिझेल १८ पैशांनी महागलंय. यामुळे पेट्रोल ८१.९१ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७३.७२ रुपये प्रतिलिटर इतकं महागलं आहे.
Please follow and like us: