आज खरे तर बकरी ईद. मुस्लीम बांधवांचा सण. याच दिवशी मेंदू मृत झालेल्या मुस्लीम तरुणाचे अवयवदान

आज खरे तर बकरी ईद. मुस्लीम बांधवांचा सण. याच दिवशी मेंदू मृत झालेल्या मुस्लीम तरुणाचे अवयवदान करण्याचा निर्धार त्यांच्या कुटुंबीयांनी केला. अलीकडच्या काळात अवयव दानाची चळवळ गतीमान होताना दिसत आहे. शासन आणि सामाजिक संस्थांनी केलेल्या जनजागृती मोहिमेचा हा परिणाम म्हणावा लागेल. ज्याला समाजातूनही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अशीच एक अवयव दानाची प्रक्रिया बुधवारी सोलापुरातून पार पडणार आहे. यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला आहे.

हेही वाचा :- डॉक्टर बनण्याचं स्वप्न लोकलमधून पडून अपघात रुणालीला मिळाला मदतीचा हात, शिवसेना उचलणार यापुढील खर्च

उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथील व्यक्तीचे अवयवदान केले जाणार आहे. त्याची एक किडनी, स्वादुपिंड, डोळे हे अवयव पुण्याच्या सहयाद्री हॉस्पिटलला रवाना होणार आहेत. यासाठी ग्रीन कॉरिडॉर राबविण्यात येणार आहे. उस्मानाबाद शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यक युनुस सत्तार शेख असे ब्रेन डेड झालेल्या रुग्णाचे नाव आहे. १९ ऑगस्ट रोजी सोलापूर-तुळजापूर रस्त्यावरील शिरवळ येथे झालेल्या अपघातात युनूस यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तुळजापूर, उस्मानाबाद येथे उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापुरात आणण्यात आले होते.

हेही वाचा :- डोंबिवलीत प्रथमच कर्णबधीर मुलांची फुटबॉल स्पर्धा …

मंगळवारी रात्री उशिरा त्याची तपासणी केली असता मेंदूमृत झाल्याची घोषणा अश्विनी रुग्णालयाने केली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन केल्यानंतर त्यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मेंदू मृत रुग्ण यूनुसची एक किडनी, स्वादुपिंड, डोळे या अवयवाचे दान करण्यास मान्यता मिळाली. एक किडनी व स्वादुपिंड पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलला रवाना होणार आहे. ससून रुग्णालयास लिव्हर, शासकीय रुग्णालय सोलापूर येथे दोन डोळे तर एक किडनी सोलापूरच्याच अश्विनी रुग्णालयातील रुग्णास प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. मेंदू मृत रुग्ण हा उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथील रहिवासी आहे. त्याच्या पश्चात तीन मुले, पत्नी, भाऊ, आई असा परिवार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email