आजी आजोबा पार्कमध्ये व्हेलेंटाईन डे निमित्त उत्साह साठीचा
ठाणे-जेष्ठ नागरिकांना सदैव आनंदी ठेवण्याकरीता त्यांच्या कला गुणांना वाव देण्याच्या हेतूने व त्यांच्या मनातील इच्छा पुर्ण करण्याकरीता व्हेलेंटाईन डे निमित्त ठाण्यात रोटरी क्लब पारसिक हिल्सच्या संयुक्त विद्यमाने आयडियल ग्रुप तर्फे स्वीट ६० उत्साह साठीचा या नावे पी सावळाराम आजी आजोबा पार्क तलावपाळी ठाणे येथे एक नवीन उपक्रमाची सुरवात करण्यात आली. या मध्ये जेष्ठांच्या तारुण्यातील आठवणींना उजाळा देण्याकरिता चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता प्रवेश विनामुल्य होता. या निमित्ताने आयडियल एग्रो टूरिझम एल् एल् पी तर्फे प्रत्येक जेष्ठ नागरिकाला कोकणातील विविध कृषी केंद्रात ४ दिवस ३ रात्र मोफत वास्तव्य पिकनिक कुपन भेट देण्यात आले, रोटरी क्लब पारसिक हिल्स तर्फे स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. रोटरी कल्बचे सी. एम् बेंद्रे, कोकाटे आयडियल ग्रुपचे महादेव माने, यतिन चाफेकर,सतिश हेर्लेकर, अजय नाईक, जयंत जोशी यांचे विशेष सहकार्य लाभले.परीक्षक म्हणून मनीषा कोंडसकर यांनी काम पाहिले.