आजतक वर मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे:शिवसेनेला विसरून भाजप वर झोड.
(श्रीराम कांदु )
🔸मी पेशाने व्यंगचित्रकार आहे आणि आम्हाला बातम्या वाचून व्यंगचित्र सुचतात पण आजकाल बातम्या शोधाव्या लागतायत.
🔸मुख्यप्रवाहातील माध्यमांमध्ये बातम्या दाबल्या गेल्या तरी सोशल मिडियामुळे काहीच लपून राहत नाही.
🔸खरं तर दाऊदची भारतात येण्याची इच्छा आहे. पण भाजप सरकार त्याला भारतात ओढून आणलं असं सांगणार आणि निवडणुका लढवणार कारण त्यांना माहित आहे की आपला भारतीय मतदार भावूक आहे.
🔸माझ्या राजकारणाच्या २५ वर्षांच्या प्रवासात इतकी भाषणं देणारे ,निवडणुकांच्या प्रचारात इतका मश्गुल पंतप्रधान मी पहिल्यांदा पाहिला.
🔸पंतप्रधान स्वत:च्याच राज्यात निवडणूक प्रचाराला सतत जाणं हे दुर्बलतेच लक्षण आहे.
🔸हार्दिक पटेलबद्दल जर बोलायचं झालं तर मी इतकंच म्हणेन की तरुण जर राजकारणात येत असतील तर चांगलं आहे.
🔸सांगण्यासारखं किंवा दाखवण्यासारखं काहीच उरलं नाही म्हणून भाजप आता ताजमहाल सारखे मुद्दे काढत आहेत. जनता या मुद्द्यांना आता भुलणार नाही.
योगी आदित्यनाथ यांना आजच ताजमहाल का खुपायला लागला? इतकी वर्ष तो आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. खरं तर ताजमहाल हे वास्तूकलेचा उत्तम नमुना आहे.
🔸संपूर्ण देशाच्या रेल्वेचा कायापालट करायचा असेल तर ५ वर्षात १ लाख कोटी लागतील हा काकोडकर समितीचा अहवाल. मग फक्त एका बुलेट ट्रेनसाठी १.१० लाख कोटींच कर्ज काढण्याची आवश्यकता का आहे?
🔸बुलेटट्रेन कोणासाठी फक्त गुजरातमधील काही व्यापारांसाठी मग त्याचा आर्थिक भार संपूर्ण देशाने का सोसायचा?
🔸महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे बसवलेले मुख्यमंत्री आहेत ,त्यांची काय हिंमत आहे बुलेट ट्रेनला विरोध करण्याची?
🔸संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली हे गुजरातच दुःख आहे त्यासाठी बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे.
🔸कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आला तरी बेहत्तर, बुलेट ट्रेनची वीटही रचू देणार नाही.
🔸लक्ष्मीपूजन व्यंगचित्रं. सध्या सगळ्यात जास्त पैसे हे भाजपकडे आहेत. आणि म्हणून लक्ष्मीलाही त्यांच्याकडे पैसे मागायला लागतयात.
🔸नोटबंदी केली कशाला हे मला अद्याप कळलेलं नाही.
🔸जगात मंदी होती तेव्हा स्थिरस्थावर असणाऱ्या अर्थव्यवस्थेला डबघाईकडे का नेलंत?
🔸देश आर्थिक गर्तेत आधी टाकायचा, तो वर काढण्यासाठी संपूर्ण देश स्वत: ची उर्जा पणाला लावतोय आणि मग म्हणायचं आम्ही देश वर काढू हा काय खेळ आहे?
🔸माझ्या माहितीप्रमाणे खरं या देशात खेळता पैसा किती होता याचा खरा आकडा बाहेर आला नाही कारण या सरकारने वारेमाप चलन छापलं होतं.
🔸हिंदू वर्तमानपत्राची बातमीनुसार रेड्डी नावाच्या माणसाकडे नोटाबंदीनंतर १ महिन्यात २००० नव्या नोटांची ३३ करोड रुपये कॅश मिळाली. इतका पैसा आला कुठुन?
🔸जुन्या नोटांमधील 99 टक्के नोटा परत आल्या मग काळा पैसा कुठे गेला?
🔸देशातील उद्योगपती, व्यापारी, सर्वसामान्य माणूस सर्व विवंचनेत आहेत.
🔸पंतप्रधान मोदींनी खरं तर देशातल्या उद्योगपतींना जगभर पसरण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं होतं. आपल्या उद्योगपतींनी जगभर स्वत: ची चमक दाखवून दिली असती.
🔸पंतप्रधानांनी देशातल्या जटील होत चाललेल्या लोकसंख्यावाढीच्या समस्येबाबत पाऊलं उचलायला हवी होती.
🔸भाजपाने स्वत: इव्हीएम मशीनवर आक्षेप घेतले होते, आता दुस-यांनी तेच आक्षेप घेतले तर काय चुकले.
🔸माध्यमांच्या मालकांचे हात दगडाखाली आहेत ते सरकारच्या चुका समोर आणू देत नाहीयेत, पत्रकारांना कितीही वाटलं तरी त्यांना काही करता येत नाहीये.
🔸भाजप राहुल गांधींना पप्पू म्हणायचे मग त्यांच्या गुजरातमधल्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून का घाबरलेत? का पंतप्रधान वारंवार गुजरातला जात आहेत?
🔸कालचा विरोधी पक्ष आज जेंव्हा सत्ताधारी बनलाय तेंव्हा त्यांना बाहेरच्या शत्रूंची गरज पडत नाही ते स्वतःच स्वतःच्या चुकांनी खड्ड्यात जातात.
🔸भाजप सोशल मीडियाचा वेडावाकडा वापर करून सत्तेत आले आता त्यांच्या चुकांवर टीका केली तर तुम्ही लोकांवर केसेस टाकणार. हा कुठला न्याय?
🔸गुजरातच्या निवडणुकांनंतर देशात विरोधी पक्ष प्रबळ होतील याची मला खात्री आहे.
Please follow and like us: