आजच्या शिक्षणसंस्था म्हणजे टंकसाळ- सुमित्रा महाजन

  (म विजय )

कल्याण – आजच्या शिक्षणसंस्था या पैसे कमाईचे साधन मानल्या जातात,मात्र शिक्षण संस्थांमधून पैसे काढायची ही पद्धत कधीच योग्य नाही अशी खंत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केली.

त्यावेळी सद्यस्थितीबाबत बोलताना सुमित्रा महाजन या भावुक झाल्या. अशा काळात शाम जोशींसारख्या व्यक्ती भेटतात तेव्हा माझ्यासारखी स्त्री विव्हळ होऊन जाते असे सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. निमित्त होते याज्ञवल्क्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे. ग्रंथसखा संकल्पनेद्वारे वाचनाचा प्रसार-प्रचार करणारे शामसुंदर जोशी यांना याज्ञवल्क्य पुरस्काराने तर प्राध्यापिका स्मिता राम कापसे यांना सुशीलताई एकलहरे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या सोहळ्यात सध्याच्या शिक्षणपद्धतीवर बोलताना सदा हसतमुख दिसणाऱ्या लोकसभा अध्यक्ष खूपच भावुक झालेल्या पहिल्यांदा दिसून आल्या. आजची परिस्थिती अजिबात सहन होत नाही. आज शिक्षण संस्था या कमाईचे साधन बनल्या आहेत. मात्र आमची ही पद्धत नसून शाम जोशी यांच्यासारखा ध्येयाने पछाडलेले वेडे पीर भेटतात तेव्हा माझ्यासारखी स्त्री विव्हळ होऊन जाते. असं सांगतानाच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळलेले दिसून आले.

आजकालच्या मुलांची मुलांची गुगल ही माता झाली असून मुलांनी काय वाचलं पाहीजे यासाठी मार्गदर्शनाची, मार्गदर्शकाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केली. तर त्यापूर्वी सुमित्रा महाजन यांनी उपस्थित राजकारणी मंडळींनाही आपल्या मिश्किल भाषेत चिमटा काढला. २ महाराष्ट्रीयन माणसे एकत्र आली की ३ संस्था काढतात असं म्हटलं जातं. मात्र त्यांच्यात ती क्षमता आहे असे आपण समजतो. त्याप्रमाणे तुम्हीदेखील राज्यात उत्तमपणे कारभार चालवला पाहीजे. असे त्यांनी खासदार कपिल पाटील आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे पाहत भाष्य केले. ज्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

यावेळी खासदार कपिल पाटील, महापौर राजेंद्र देवळेकर, आमदार नरेंद्र पवार, संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण पाठक, राजीव जोशी यांच्यासह अनेक मान्यवर आणि कल्याणकर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email