आग लागल्याने झालेल्या धुरामुळे गुदमुरून महिलेचा मृत्यू

मुंबई – इमारतीला आग लागल्याने झालेल्या धुरामुळे गुदमुरून एका ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बोरिवली येथील धर्मक्षेत्र या इमारतीत शनिवारी संध्याकाळी घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत अर्ध्या तासाच आगीवर नियंत्रण मिळविले. धुरामुळे गुदमरल्याने दोन महिलांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान जया घारसिया यांचा मृत्यू झाला. लक्ष्मी यारोला या ३५ वर्षीय महिलेवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टारांकडून सांगण्यात आले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email