आगीत एका दिड वर्षाच्या मुलीचा गुदमरून मृत्यू तर दुसरीची प्रकृती चिंताजनक

मुंबई-वांद्रे पश्चिम येथील टर्नर रोड जवळील शोयब मंजिल या इमारतीला आज दुपारी सव्वाबाराच्या सुमारास आग लागली . आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबई भाजपा अध्यक्ष आणि स्थानिक आमदार अॅड. आशिष शेलार यांनी घटनेची माहिती मिळताच साडेबारा वाजता घटनास्थळी तातडीने धाव घेतली.त्यांनी फायरब्रिगेड महापालिका अधिकारी, पोलीस यांनाही कळवले व ते घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान आग आटोक्यात आली आहे. या आगीत एका दिड वर्षाच्या मुलीचा गुदमरून मृत्यू झाला तर दुसरीवर होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत तिची प्रकृती चिंताजनक आहे. आमदार अॅड. शेलार यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊनही उपचार घेणा-या मुलीच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Leave a Reply

Your email address will not be published.