आगरी-कोळी युवकांनी कॅटरींग व्यवसायात उतरावे ; खासदार कपिल पाटील यांचे आवाहन

कल्याण- आगरी व कोळी समाजाला खाद्यपदार्थांची संस्कृती आहे. या समाजातील रुचकर खाद्यपदार्थांना सर्व समाजाकडून पसंती मिळत असल्याने, आगरी-कोळी समाजातील युवकांनी कॅटरींग व्यवसायात उतरावे. सध्या कॅटरींग व्यवसायात नफ्याचे प्रमाण चांगले असल्यामुळे युवकांना फायदा होईल, असे आवाहन भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी नुकतेच येथे केले.
कल्याणनजीकच्या मोहने येथे कोळी महासंघ व गावदेवी मित्र मंडळाने आयोजित केलेल्या आगरी-कोळी महोत्सवाचे उद्घाटन खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी आमदार नरेंद्र पवार, नगरसेविका उपेक्षा भोईर, सुनिता कोट, महासंघाचे उपनेते देवानंद भोईर, गणेश ढोणे, सतीश देशेकर, अॅड. भावेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार पाटील म्हणाले, “मुंबई व ठाण्याच्या सागरी पट्ट्याचा भूमिपूत्र असलेल्या आगरी व कोळी समाजाला सांस्कृतिक, सामाजिकबरोबरच खाद्य संस्कृती आहे. समाजातील कुटुंबात बनविल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांना पाहूण्यांची नेहमीच पसंती मिळते. तर काही ठिकाणी आगरी-कोळी खाद्यपदार्थांच्या सुरू झालेल्या हॉटेल व खानावळींमध्ये खवय्यांची रीघ लागत आहे. अमराठी खवय्यांकडून चविष्ट खाद्यपदार्थांसाठी आगरी-कोळी हॉटेल व खानावळींकडे पावले वळतात. त्याचा समाजातील युवकांनी फायदा घ्यायला हवा. सध्या बहूसंख्य समाजबांधव पारंपरिक व्यवसायांना पसंती देत आहे. पारपंरिक व्यवसायांप्रमाणेच युवकांनी कॅटरींग व्यवसाय सुरू करावेत. त्यातून दर्जेदार व रुचकर आगरी-कोळी खाद्यपदार्थ उपलब्ध करावीत. त्यातून मोठा नफा होऊ शकेल.”
मोहने येथे सुरू झालेला हा महोत्सव रविवारपर्यंत (ता. 18) सुरू राहणार आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने कल्याणवासीयांना आगरी-कोळी समाजातील खाद्यपदार्थांची मेजवानी मिळू शकेल. त्याचबरोबर समाजाच्या संस्कृतीचीही ओळख होईल.
कल्याणमधील मोहने येथे आयोजित करण्यात आलेल्या आगरी-कोळी महोत्सवात भाजपचे खासदार कपिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email