आकर्षक विद्युत रोषणाईत नाहले ठाणे चौक, प्रमुख रस्ते, महापालिका इमारती उजळल्या

( म विजय )

ठाणे (18) – महाराष्ट्राचा महाउत्सव असलेल्या आणि मनामनात आशेचा दीप उजळविणा-या दिवाळी सणाच्या निमित्ताने संपूर्ण ठाणे शहर आकर्षक विद्युत रोषणाईच्या झगमगाटात उजळून निघाले आहे.
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून आणि एमसीएचआय यांच्या सहकार्याने गेल्या दोन वर्षांपासून रोषणाईचा अनोखा अविष्कार ठाणेकर अनुभवत आहेत. यावर्षीही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण ठाणे शहर आकर्षक विद्युत रोषणाईत न्हाऊन निघाले आहे.
आनंदनगर पासून ते गायमुखपर्यंतचा मुख्य रस्ता, शहरातील इतर महत्वाचे रस्ते, तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी नाक्यांसह शहरातील सर्व महत्वाचे चौक आकर्षक विद्युत रोषणाईत न्हाऊन निघाले असून रात्रीच्या वेळी ही आकर्षक रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
त्याचबरोबर मासुंदा, कचराळी आणि उपवन तलावासह महापालिकेची मुख्य इमारत, सर्व प्रभाग समिती कार्यालये, गडकरी रंगायतन, डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह या ठिकाणीही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email