आई मरो आणि मावशी जगो’ अशी आईपणाची महती सांगणारी म्हण माणसांसह पशुपक्षांनाही लागू पडते याचा प्रत्यय

मनमाड – अनकवाडे येथील विष्णू जाधव यांच्या शेतात. सापडलेल्या मोराचे अंडे कोंबडी खाली उबवून त्यातून चार पिल्ले निघाली आणि कोंबडीने अगदी सख्ख्या आई प्रमाणे पिल्लांना यांभाळल्याची घटना मनमाडमध्ये घडली. ‘आई मरो आणि मावशी जगो’ अशी आईपणाची महती सांगणारी म्हण माणसांसह पशुपक्षांनाही लागू पडते याचा प्रत्यय आला 

अनकवाडे शिवारात विष्णू जाधव यांचा मळा आहे. गायी म्हशी, शेळ्या, कोंबड्या अशा पशुपक्षांनी त्यांचा गोठा खुराडे भरलेले आहे. नित्यनेमाने जाधव हे आपल्या शेताच्या बांधाने जात असतांना बांधाच्या खाली गवतामध्ये पांढरे शुभ्र सहा अंडे दिसले. अंडे कोंबडीच्या अंड्यापेक्षा आकाराने काहीसे मोठे होते. त्यांनी जागीच थांबून आसपास पाहिले कोणीच दिसले नाही.

अंडे कोणत्या पक्षाचे असेल याचा विचार करत सभोवताली पाहत असतांना त्यांना इतस्थ लांडोरीचे पंख पडलेले दिसले. अंड्यावरील लांडोर मादी कोल्ह्या कुत्र्यांनी मारली असल्याचे लक्षात येताच जाधव यांनी हातात अंडी उचलून घरची वाट धरली. अंडी घरी आल्यावर पत्नी किशोरी जाधव यांच्याकडे दिले त्याचवेळी जाधव यांच्या कोंबड्यातील एक कोंबडी खुड झाली होती.

किशोरीबाईंनी सहा अंडी आणि कोंबडीची सहा आशा बारा अंड्यावर खुड झालेली कोंबडी एका टोपल्याखाली बसवली. अंडे घोळणे, उबवणे सुरू असतांनाच काही दिवसांनी यातील नेमकी मोराच्या सहा अंड्यापैकी चार अंड्यातून पिल्ले निघाली आणि दोन अंडे गंदे निघाले. मात्र कोंबडीने इतर सहा कोंबडीचे अंडे घोळणे सोडून दिले. या चार मोराच्या पिल्लांचा ती आपले पिल्लू समजून आईची माया देऊन त्यांना जीव लावू लागली.

आज तीन दिवस झाले पिल्ले कोंबडीच्या पिल्लांच्या आकारापेक्षा मोठे आहे. आपलीच पिल्लं समजून त्यांना आपल्या पंखात घेऊन बसते. पिल्लांना कोणी हात लावला तर चोचीने टोचा मारते. ते लांडोरीचे-मोराचे पिल्ल कोंबडीने आपलेच समजुन आईची माया दिली आहे जणु ते सुद्धा त्यातलेच वाटते कोंबडीच्या पिल्ला पेक्षा त्याची वाढ जास्त वाटत आहे.

इतर पिलांच्या तुलनेत आकारानं मोठी असलेली, आणि झपाट्यानं आकार बदलणारी चार मोराची पिलं कोंबडीच्या इतर पिलांसोबत चरतांना दिसतात. तशी ती पिल्लं कोंबडीच्या पिलांसोबतच वाढत आहे कोंबडीच्या पिलांसोबतच खातपित आहे कोंबडीने आवाज दिल्याबरोबर मोराची पिल्ले कोंबडीकडे धावून येतात. मात्र ही पिल्ले लहान असल्याने मादी आहे की नर हे कळू शकत नाही. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email