आईला दिलेला त्रास सहन न झाल्याने १६ वर्षीय मुलाने केली आत्महत्या,डोंबिवलीतील घटना

डोंबिवली – लग्ना नंतर एका महिलेला तिच्या पतीसह तिच्या सासरच्या मंडळीनी तिला मनासिक व शारीरिक त्रास दिला या महिलेच्या १६ वर्षीय मुलाला आपल्या आईला होणार त्रास सहन न झाल्याने या मूलाने ६ व्या मजल्या वरून खाली उडी घेत आपली जीवन यात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना डोंबिवलीत घडली असून या महिलेने या विरोधात आपल्या पतीसह सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दखल केला आहे .डोंबिवली पूर्व डी एन सी रोड सुनील नगर आत्मसृष्टी मध्ये राहणारी कविता तेलंग यांचे उमेश तेलंग यांच्याशी लग्न झाले होते .त्यांना हिमांशू तेलंग नावाचा 16 वर्षाचा मुलगा होता .लग्नानंतर कविता यांचा पती उमेश ४२ , सासू अनुराधा ६७ ,नणंद निर्मला गुग्गील ४८ ,दीर कैलास ,व जाऊ राधा हे सगळे  या ना त्या कारणावरून कविता यांना मानसिक व शारीरिक त्रास देत होते .आपल्या आईला होणार त्रास सहन न झाल्याने त्याने 3 मे रोजी घरच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली .या घटने मुळे कविता यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता काल या प्रकरणी आपल्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत कविता यांनी डोंबिवली पोलीस स्थानकात पती उमेश ४२ , सासू अनुराधा ६७ ,नणंद निर्मला गुग्गील ४८ ,दीर कैलास ,व जाऊ राधा विरोधात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी सबधीताविरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email