आईने केली चिमुरडीची हत्या ;मध्य प्रदेशातील अमानुष घटना

भोपाळ – मध्य प्रदेशात एका महिलेने आपल्याच चिमुरडीची हत्या करून आई या पवित्र नात्याला कलंकित करणारं कृत्य केलं आहे. घटनेच्या चार तासात भोपाळमधून आरोपी महिलेला अटक करण्यात आली. दुधासाठी रडणा-या आपल्याच एक वर्षाच्या चिमुरडीची महिलेने कोयत्याने गळा कापून हत्या केल्याची अमानुष घडली आहे. मध्य प्रदेशातील धार गावात ही घटना घडली आहे. दूध न मिळाल्याने बाळ एकसारखे रडत होते. अशावेळी आपल्या बाळाला दूध देण्याऐवजी महिलेने तिची गळा कापून हत्या केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email