आंतर शालेय मिनी मॅरेथॉन स्पर्धेत धावले सुमारे ५ हजार विद्यार्थी
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.२९ – शिवाई बालक मंदिर ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कल्याण तालुका आंतर शालेय मिनी मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे ५ हजार विद्यार्थ्यानी भाग घेतला. यंदाचा सीमा ठोसर चॅम्पियन चषक मध्य रेल्वेच्या मादयमिक शाळेने पटकवला.
खासदार डॉ श्रीकांत शिंदे व आमदार सुभाष भोईर याचे हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले मध्य रेल्वेने १० पारितोषिके पटकावली.
सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात मोठ्या उत्साहात स्पर्धेला सुरवात झाली कल्याण तालुक्यातील ८१ शाळातील ५ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते मुलाच्या ४ गटात २८२२ तर मुलींच्या ४ गटात २२७० स्पर्धक सहभागी होते मतिमंद व गतिमंद गटासाठी वेगळा गट तयार केला होता या स्पर्धेसाठी सकाळ पासूनच विद्यार्थी व पालकांनीक्रीडासकुलात गर्दी केली होती.
१५ ते १८वयोगटातील स्पर्धेत वाहिद सलमाने (प्रथम)अकविलउद्दीन मणिहार (द्वितीय)व अलोक कुमार(तृतीय )तर मुलीच्या गटात नमिता घागस (प्रथम)स्नेहा थोल(मढवी स्कुल दुसरा )क्रमांक पटकावला तर मूकबधिर गटात सागर भोईर (प्रथम )तर आदिनाथ भुजबळ (द्वितीय रोटरी फॉर डेफ)व मतिमंद गटात शुभम शेरे (अस्तित्व ,प्रथम )तर प्रतीक आगवणे (अस्तित्व ,द्वितीय )यांनी पुरस्कार मिळवले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका मिताली इनामदार व मारुती शिंदे ,आयोजक विपलव भागवत मनोज घरत ,प्रकाश भोईर आदींनी परिश्रम घेतले.