आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2018 चे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन

नवी दिल्ली, दि.२५ – राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2018 चे उद्‌घाटन केले. नैतिकतेवर आधारित आधुनिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आर्य समाजाचे भरीव योगदान आहे. समाजातल्या सर्व स्तरासाठी विशेषत: महिला आणि वंचितांच्या उन्नतीसाठीही आर्य समाजाचे मोठे कार्य आहे असे गौरवोद्‌गार राष्ट्रपतींनी यावेळी काढले.

स्वामी दयानंद सरस्वती हे सामाजिक आणि आध्यात्मिक सुधारणांचे पुरस्कर्ते होते. महिला सबलीकरण आणि अस्पृश्यता निर्मुलन यासह सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणांसाठी त्यांनी प्रभावी उपाययोजना केल्याचे राष्ट्रपती म्हणाले. भारतीय समाज आणि संपूर्ण जगासाठीही दयानंद सरस्वती यांचे कार्य आजही समर्थक असल्याचे ते म्हणाले.

अंधश्रद्धा निर्मूलन, आधुनिकीकरण, महिला सबलीकरण, आदिवासी कल्याण, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन यासारख्या विषयावर या संमेलनात चर्चा होणार असल्याबद्दल राष्ट्रपतींनी संतोष व्यक्त केला.

पर्यावरण रक्षणामध्ये योगदान देण्याच्या दृष्टीने सौर ऊर्जा आणि याप्रमाणे इतर पर्यायी उर्जा स्रोतांचा वापर करण्याला प्रोत्साहन देण्यासाठीही आर्य समाज कार्य करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published.