अॅड. राजाराम तारमळे यांना “ ठाणे गुणीजन ” पुरस्कार
अॅड. राजाराम तारमळे यांना “ ठाणे गुणीजन ” पुरस्कार
ठाणे जिल्हा वकील संघटनेचे माजी चेअरमन व विद्यमान सदस्य अॅड. राजाराम तारमळे यांना सन २०१७ सालचा “ ठाणे गुणीजन ” हा सम्माननीय पुरस्कार नुकताच झालेल्या ठाणे महानगर पालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त गडकरी रंगायतन ठाणे येथे झालेल्या समारंभात महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते देण्यात आला. सदर समारंभाला ठाण्याचे खासदार मा. राजनजी विचारे, ठाणे जिल्हा शिवसेनाप्रमुख नरेशजी म्हस्के, आमदार रविंद्र फाटक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
तसेच सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणविस यांच्या मातोश्री श्रीमती सुमित्रा फडणविस या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
अॅड. राजाराम तारमळे यांना सर्व स्तरावर हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव चालू आहे.