असे वाद मनसेला परवडणार नाही

मुंबई, दि.०४ – मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांनी त्यांच्या भागातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी ‘एल’ वॉर्डमध्ये पालिका अधिकार्‍यांसोबत बैठकीचे आयोजन केले.चर्चा सुरू असताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांची भूमिका न पटल्याने संदीप देशपांडे हे तात्काळ बैठकीतून निघून गेले. हा सर्व प्रकार प्रमसारमाध्यमांच्या कॅमेर्‍यासमोर घडला. गुरुवार-केंद्र व राज्यातील भाजप सरकारविरोधात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जोरदार भूमिका घेतलेली असतानाच त्यांच्याच पक्षातील नेत्यांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले. मुंबईत एका आंदोलना दरम्यान मनसेच्या दोन बडया नेत्यांमध्ये आपसात समन्वय आणि सामंजस्याचा अभाव दिसून आला.

मुंबईतील एल वॉर्डात मनसेचे शिष्टमंडळ पालिका अधिकार्‍यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी वळूज नावाच्या अधिकार्‍याने आपण या वॉर्डमध्ये नवीन असून तुमच्या समस्या लवकरच सोडवू, असे आश्वासन दिले. पण देशपांडे यांना पालिका अधिकार्‍याचे उत्तर पटले नाही. त्यांनी नेहमीप्रमाणे आक्रमक भूमिका घेतली. त्यावेळी नांदगावकर यांनी वॉर्ड अधिकार्‍याला थोडा वेळ दिला पाहिजे, असे मत व्यक्त केले. नांदगावकर यांची ही भूमिका देशपांडे यांना पटली नाही. पक्षाचे प्रमुख नेते आपली बाजू घेण्याऐवजी पालिका अधिकार्‍याला साथ देत आहेत म्हणून ते बैठक सोडून निघून गेले.या प्रकारामुळे मनसेच्या नेत्यांमधले अंतर्गत मतभेद चव्हाटयावर आले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ येत असताना असे वाद मनसेला परवडणारे नाहीत. मनसेला दुसर्‍या फळीच्या नेत्यांची उणीव तीव्रतेने जाणवत असताना अशा वादांमुळे कार्यकर्त्यांचे आणखी खच्चीकरण होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published.