अष्टविनायक पदयात्रा सर्वात कमी वेळात पूर्ण करणारे गणेशभक्त दीपक फुरसुंगे यांच लिमका बुकमधे नाव

अवघ्या १४ दिवसात ८३७ किलोमीटर पायी यात्रा

(महेश शर्मा)

गणेशभक्त दीपक मेघराज फुरसुंगे १४ वर्षांपासून अष्टविनायक यात्रा करत असून यावेळी त्यांनी केलेल्या अष्टविनायक यात्रेला लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समधे स्थान मिळाले आहे.63 वर्षीय दीपक फुरसुंगे यांनी आपले मित्र सतीश शिंदे, व जनार्दन ओलेकर यांच्यासह २०१६मध्ये अवघ्या १४ दिवसात ८३७ किलोमीटर पायी यात्रा करत सदर  कीर्तिमान स्थापित केला आहे.ही अष्टविनायक यात्रा दीपक फुरसुंगे व इतरांनी मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर येथून प्रारंभ केली होती.आणि २१ ऑगस्ट २०१६ ही यात्रा पूर्ण झाली.दीपक फुरसुंगे यांचं दीपक गॅरेज नावाचं एनफील्ड बुलेट रिपेयरिंग सेंटर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.