अश्लील क्लिप बनवुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार :६ अटक ३ फरार
मुंबई-अल्पवयीन मुलीची अश्लील क्लिप बनवुन त्याद्वारे तिला ब्लॅकमेल करुन तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे.याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली असून ३ जण फरार आहेत.
याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार १८ महिन्यांनपूर्वी आरोपिंपैकी एकाने सदर पिडितेला घरी बोलावून तिला अश्लील क्लिप दाखवून तिच्याशी शारीरिक संबध बनवले.त्याने मोबइलवर याची क्लिप बनवली.नंतर त्याद्वारे तिला ब्लॅकमेल करुन तिच्यावर एकामागोमाग ९ जणांनी अत्याचार केले.या प्रकाराने त्रस्त होवून पीड़ित मुलगी ४ महिन्यांपूर्वी घर सोडून गेली.काही दिवसांपूर्वी ती परत आली.१५ दिवसांपूर्वी आरोपींनी पन्हा तिच्यावर अत्याचार केला.तेव्हा तिने याबद्दल तिच्या आईला सांगितले.शनिवारी याप्रकरणी विलेपार्ले पोलिसात तक्रार केली.याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली असून ३ जण फरार झाले आहेत.