अशीही समाजसेवा ……  रेल्वे स्थानकावरील मनोरुग्ण, भिकारी आणि अंध, अपंग व्यक्तींचे कापतो केस आणि दाढी   

डोंबिवली – समाजकार्य करायचे ठरवले तर ती कोणत्याही पद्धतीने करता येते. त्यासाठी असावी लागते ती इच्छाशक्ती …भांडूप मधील समाजकार्याला वाहून घेतलेल्या एका तरुण दर महिन्यातले दोन दिवस  ठाणे ते  बदलापूर रेल्वे स्थानकावरील वास्तव करणाऱ्या मनोरुग्ण, भिकारी आणि अंध,अपंग व्यक्ती यांचे मोफत  केस  आणि दाढी कापण्याचे काम करत आहे.या कार्याचा गौरव करत नुकतेच झालेल्या   ‘टिटवाळा महोत्सवात  २०१८ ‘मानाचा  पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

    भांडूप येथील रवींद्र बिरारी यांचे हेअर कटिंग सलून आहे. आपला  व्यवसाय सांभाळून ते गेली सात ते आठ वर्ष ही समाजसेवा करत आहेत. अनेक मनोरुग्ण, भिकारी आणि अंध, अपंग व्यक्तींचे केस आणि दाढी कापतात.त्याच्या कामाची समजात कौतुक होत असले तरी त्यांनी कधीही यांची प्रसिद्धी केली नाही.एवढेच नव्हे तर बिरारी हे मनाला समाधान मिळतंय म्हणून काम करायचं  हा साधा विचार मनाशी ठेवून आदिवासी खेड्या- पाड्यात मुलांना शैक्षणिक  साहित्य ,पाड्यावर धान्य देत असतात.  हे काम करत असताना अनेक मनोरुग्ण त्यांच्या अंगावर धावून आले होते. मात्र त्यांनी हे काम काम थांबवले नाही. या कार्याचा गौरव करत नुकतेच झालेल्या   ‘टिटवाळा महोत्सवात  २०१८ ‘मानाचा  पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्याच्या या कार्याबद्दल विचारले तेव्हा `प्रत्येक व्यक्ती  गरजू व्यक्तीला भले पैशाने  मदत नाही करू शकत. पण आपल्याकडे जे सहज करण्यासारखे आहे त्या का होईना मदत करू शकतो` अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email