अवघ्या ५० पोलीसांवर आठ रेल्वे स्थानकांच्या बंदोबस्ताची जबाबदारी…

डोंबिवली दि.१८ – मध्य रेल्वेवरील डोंबिवली रेल्वे स्थानक हे सर्वाधिक गर्दीचे स्टेशन जाहीर झाले आहे. या स्थानकावरुन रेल्वेला उत्पन्नही तेवढेच मिळत आहे .डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हददीत मध्य रेल्वेवरील कोपर व ठाकुर्ली या तीन स्थानकांसह दिवा वसई मार्गावरील अप्पर कोपर,भिंवडी,खारबाव,कामण व जचंद्र या पाच अशा एकूण आठ रेल्वे स्थानकांच्या बंदोबस्ताची जबाबदारी डोंबिवली लोहमार्ग पोलीस स्थानकावर असून लोहमार्ग पोलीस ठाण्यात अवघे ५० पोलीस कार्यरत आहेत.यामुळेया पोलीसांवर कमालीचा ताण येत आहे.डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात सध्या पटावर १०० पोलीस असले तरी सध्या निवडणूक बंबोबस्तासाठी ५० पोलीस बाहेर गावी पाठवण्यात आले आहेत.

यासंदर्भात पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निवडूकीच्या बंदोबस्तासाठी ५० पोलीस बाहेर असले तरी प्रत्यक्ष ५० कर्मचाऱ्यांपैकी रात्रीच्या वेळेत महिला डब्यांत रक्षणासाठी एका ट्रेनमध्ये तीन पोलीस दिले जातात यामुळे प्रत्यक्ष आठ रेल्वे स्थानकांवर बंदोबस्तासाठी हातावर मोजण्याऐवढेच पोलीस शिल्लक असतात.कर्मचार्यानी दिलेल्या माहितीनुसार रोज किमान पाच पोलीस साप्ताहिक सुटटीवर,तेवढेच कोर्ट काम वा इतर कामावर असतात.डोंबिवली रेल्वे स्थानकावरुन रोज सुमारे अडीच लाख प्रवासी प्रवास करतात व रोजचे उत्पन्न सुमारे १७ लाख रुपये इतके आहे.डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याची हद्द कोपर व ठाकुर्ली पर्यत तर दिवा वसई मार्गावर अप्पर कोपर,भिवंडी,खारबाव,कामण,व जुचंद्र इतकी स्टेशन असून या मार्गावर लक्ष ठेवण्याचे काम लोहमार्ग डोंबिवली पोलीसांना करावे लागते गेले अनेक वर्षे शासनाने पोलीस भरती बंद केली असून निवृत्त झालेल्या जागा,बदलीवर गेलेले कर्मचारी यांच्या जागा आजही रिकाम्याच पडल्या आहेत.डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हददीत रोज सुमारे ५० ते ६० गुन्हे घडत असतात असेही कर्मचारी सांगतात.डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हददीत इतर सात रेल्वे स्थानके असून यासर्व पोलीस ठाण्यावर आज औषधालाही पोलीस दिसत नाही अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.याबाबतडोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार  यांना विचारले असता  डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हददीत आठ रेल्वे स्थानके असून ५० पोलीस कर्मचारी निवडणूक कामानिमित्त बाहेर गावी असून पोलीस ठाण्यात कर्मचारी कमी पडत आहेत. मात्र तरीही सर्वत्र बंदोबस्त येाग्य ठेवला जातो/

Leave a Reply

Your email address will not be published.