अल्पवयीन विद्यार्थिनीवर नेपाळी वॉचमन ने केला बलात्कार,ठाकुर्ली बावन चाळ परिसरातील घटना
दोन सहाकार्यांच्या मदतीने अपहरण करत बेशुद्ध करून अल्पवयीन मुलिवर लैंगिक अत्याचार
डोंबिवली – रात्री नऊ वा जण्याच्या सुमरास सदर पीडित अल्पवयीन मुलगी दुकानातून परतत असताना ओळखीचा फायदा घेत एका नराधमाणे तिला तोंडावर रुमाल टाकून बेशुद्ध केले व आपल्या दोन साथीदारच्या मदतीने एका वाहनात घालून बावनचाळ परिसरातील एका झाडीत नेऊन नराधमाने तीच्यावर बलात्कार केला .या प्रकरणी टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी लोकराज थापा या नराधमासह त्याच्या दोन साथीदारा विरोधात गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .दरम्यान लोकराज थापा हा वॉचमनचे काम करत होता.
डोंबिवली पश्चिम येथे सदर पीडित अल्पवयीन 15 वर्षीय मुलगी पोटात दुखत असल्याने गोळी घेण्यासाठी सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नजीकच्या दुकानात गेली होती.गोळी न मिळाल्याने ती पुन्हा घराच्या दिशेने परतत असताना तिला वाटेत लोकराज थापा हा ओळखीचा इसम भेटला .थापा याने आपल्या दोन साथीदाराच्या मदतीने या मुलीला पकडून तोंड रुमालाने दाबून तिला बेशुद्ध केले व एका वाहनात घालत डोंबिवली पश्चिमेकडील बावनचाळीतील निर्जन स्थळी एका झाडीत नेले .तेथे या पीडित अल्पवयीन मुलीला व तिच्या बहिनीला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला . या प्रकरणी सदर पीडित तरुणीने टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी लोकराज थापा या नराधमासह त्याच्या दोन साथीदारा विरोधात गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .दरम्यान ठाकुर्ली नजीक असलेल्या बावन्न चाळ च्या विस्तीर्ण परिसरातील रस्त्यावरील दिवा बत्ती बंद असून या निर्जन रस्त्यावर गर्दुल्यांचा राबता असतो तसेच
कॉलेजच्या तरुण तरुणी फिरण्यासाठी येत असतात तरुण तरुणीने एकटे पाहून गुंड प्रवृत्तीचे लोक त्याना घरी वाच्यता करू सांगून नाहक त्रास देत लुबाडण्याचे प्रकार नेहमीच करीत असतात रेल्वेचे आरपीएफ पोलिस व स्थनिक पोलिसाची या भागात गस्त कमी असल्याने आशा अनैतिक धंद्यांना उधाण आले त्यामुळे पोलीस यंत्रणेने निदान आता तरी या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा तैनात करावी अशी मागणी केली जात आहे .
Please follow and like us: