अल्पवयीन मुलीवर बलात्कार आरोपी अटक साथिदाराचा शोध सुरु
एम् विजय
अंबरनाथ-अल्पवयीन मुलीला तुझ्याशी बोलायचे आहे, असा बहाणा करून मित्राच्या रुमवर नेऊन तिथे बलात्कार केल्याची घटना नुकतीच अंबरनाथ शहरात घडली. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हरिओम (१८) असे आरोपीचे नाव आहे. तर हरिकेश असे आरोपीला मदत करणाऱ्या साथीदाराचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नराधम हरिओमने याने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला रस्त्यात थांबवून तुझ्याशी बोलायचे आहे, असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर बोलण्यात गुंतवून तिला मित्राच्या रुमवर नेण्यातआले. त्याठिकाणी या पीडित अल्पवयीन मुलीवर आरोपीने बलात्कार केला. याप्रकरणात त्याचा मित्र हरिकेश याने नराधमाला मदत करण्याकरिता रुमला बाहेरुन कुलूप लावले होते.पीडीत मुलीच्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलीस ठाण्यात नराधम हरिओम व हरिकेश या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हरिओमला न्यायालयात हजर केले असता त्याला ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस हे आरोपीचा साथीदार हरिकेश याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत