अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीना अटक
बदलापुर – एका अल्पवयीन मुलीला डोंगरावर नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिन्ही नराधमांना पोलीसांनी तात्काळ अटक केली असून रविंद्र सांजेकर (२४), अहमद खान (१८) रा. शिरगाव असे अटक आरोपींची नावे आहेत तर एका आरोपी अल्पवयीन आहे.
बदलापूर पूर्व येथील गणेशनगर, आपटेवाडी भागात राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीच्या ओळखीचे असणारे हे तीन नराधम तिला पनवेल हायवे येथील डोंगरावर घेऊन गेले. या ठिकाणी या तिन्ही नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. घटना घडल्यानंतर पीडित मुलगी गेले दोन दिवस बेपत्ता होती. आई-वडिलांना हि घटना समजल्यावर ते आपल्याला ओरडतील या भीतीने ही पीडित मुलगी बेपत्ता होती. त्यामुळे पोलीस या पिडीत मुलीचा कसून शोध घेत होते. या मुलीच्या शोधासाठी विविध पथके वेगवेगळ्या भागात पाठवण्यात आली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीपकुमार राजभोज यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार ही मुलगी घराजवळील एका गार्डनमध्ये बसली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन पीडित मुलीला ताब्यात घेतले आणि हा सामुहिक अत्याचारचा धक्कादायक प्रकार समोर आला.