अल्पवयीन मुलीचं लग्न लावून दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल
उरण – अल्पवयीन मुलीचं लग्न लावून दिल्या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांसह इतर काही जणांवर कारवाई करण्यात आली आहे. उरण तालुक्यातील एका १६ वर्षाच्या मुलीचे जबरदस्तीने लग्न लावण्यात आले होते. या बाबत कर्जत येथील जिल्हा व बाल संरक्षक कक्ष अधिकारी यांनी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनंतर उरण पोलिसांनी मुलीचे आईवडील व त्यांना मदत करणाऱ्या इतर लोकांविरोधात बाल विवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे. मात्र या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसल्याची माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी यांनी दिली.
Please follow and like us: