अलाहाबाद शहराचे नाव लवकरच बदलण्यात येणार
अलाहाबादमध्ये गंगा आणि यमुना या दोन नद्यांचा संगम होतो. त्यामुळे अलहाबादला प्रयागराजही म्हटले जाते. त्यामुळे भविष्यात हे शहर प्रयागराज नावाने ओळखले जाईल, असे संकेत योगी आदित्यनाथ यांनी दिले. अलाहाबादचे नाव प्रयागराज असावे, अशी अनेक लोकांची इच्छा आहे. त्यामुळे सर्वांनी मान्यता दिली तर अलाहाबादचे नाव बदलण्यात येईल, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील वर्षी १५ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी शहराचे नाव बदलण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
Please follow and like us: