अमृतसरमध्ये रावणदहनासाठी जमलेल्यांना भरधाव ट्रेनने उडवले, 50 हून अधिक जणांचा मृत्यू video

अमृतसर -रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये शुक्रवारी रात्री घडली होती. दरम्यान, येथे आयोजित करण्यात आलेल्या रावणदहनाच्या कार्यक्रमाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारण्यास स्थानिक प्रशासन आणि रेल्वेकडून टाळाटाळ होत असली तरी येथील आयोजनाला पोलीस प्रशासनाकडून परवानगी मिळाली असल्याचे पुरावे समोर आले आहेत.

ट्रॅकवर बरीच माणसं बसल्याचं मोटरमनला दिसलं, तेव्हा ट्रेनचा वेग ताशी 90 किलोमीटर होता. मोटरमनने पूर्ण कसब पणाला लावून तो ताशी 65 किलोमीटर केला. या वेगातील ट्रेन थांबण्यासाठी किमान 625 मीटर अंतर गरजेचं आहे. त्यामुळे वेग कमी करूनही दुर्घटना टाळता आली नाही, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी दिली. मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक का लावला नाही, असा प्रश्न बरेच जण करताहेत. परंतु, हा प्रयत्न अधिक जीवघेणा ठरला असता. ताशी 90 किमी वेगाने ट्रेन धावत असताना इमर्जन्सी ब्रेक लावला असता तर ट्रेनचे डबे ट्रॅकवरून घसरले असते आणि परिस्थिती हाताबाहेर गेली असती, याकडे लोहानी यांनी लक्ष वेधलं.

मोटरमनने हॉर्न वाजवला असेल, तरी तो फटाके आणि ध्वनिक्षेपकांमुळे ट्रॅकवर बसलेल्या लोकांना ऐकू गेला नसावा. तसंच, लेव्हल क्रॉसिंगही घटनास्थळापासून दूर असल्यानं अधिकारीही काही करू शकत नव्हते, असं लोहानी यांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमाची पूर्वसूचना रेल्वेला देण्यात आली नव्हती. त्यामुळे या अपघातासाठी रेल्वेला जबाबदार धरणं चुकीचं असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email