अभिलेखांचे सुव्यवस्थित वर्गीकरण करण्याचे काम हाती,जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे कर्मचारी उस्फुर्तपणे करत आहेत अभिलेखांचे वर्गीकरण

( श्रीराम कांदु )

ठाणे दि ३ नोव्हेंबर : गेल्या अनेक वर्षापासून ठाणे जिल्ह्या परिषदेच्या विविध विभागात असणारा कार्यालयीन दस्तऐवज आता अद्यावत करण्याची प्रक्रिया जलद गतीने जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांमध्ये सुरु आहे. एका बैठकी दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी ‘अभिलेख वर्गीकरणाच्या सूचना सर्व विभागप्रमुख तसेच गट विकास अधिकारी यांना दिल्या. तसेच झिरो पेंडन्सी अॅड डेली डिस्पोजल अर्थात ‘शून्य प्रलंबितता आणि दैनिक निर्गती’ या कार्यालयीन पद्धतीचा अवलंब करण्याची सूचनाही केली होती. त्यानुसार हा उपक्रम सुरु करण्यात आला असून १० नोव्हेंबर पर्यंत अभिलेखांचे वर्गीकरण करण्याचे लक्ष देण्यात आलेले  आहे.

शासकीय कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात वर्षानुवर्षे अभिलेख साठून राहतात त्यामुळे कार्यालयीन उपयोगासाठी जागा अपुरी पडते. परिणामी प्रलंबित प्रकरणी कामाचा शोध घेणे आणि ती निर्गत करणे अवघड होते. परंतू या पद्धतीमुळे आता दैनंदिन कामाचा निपटारा करणे सोपे होणार आहे. अनेक वर्षापासून अस्ताव्यस्तपणे पडून राहिलेले दस्तऐवज आता अद्यावत करून अभिलेख कक्षामध्ये पाठवण्याचे काम करण्यात येत आहे.

राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागा अंतगर्त या उपक्रमाची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनके दिवसापासून जिल्हा परिषदेचे कर्मचारी अभिलेखांचे वर्गीकरण वं अद्यावतीकरणं करण्याच्या कामात गर्क आहेत.

प्रत्येक विभागाच्या विभागप्रमुखानी आपापल्या विभागात या उपक्रमाबाबत कर्मचाऱ्यांना सूचना केल्या असून जलदगतीने या कामाला गती मिळाली आहे. या उपक्रमामुळे शासकीय कामाचे व्यवस्थापन करणे , अभिलेख जतन करणे , गोषवारे व्यवस्थित ठेवणे , आदी काम वेळच्या वेळी होऊन नागरिकांच्या वं प्रशासकीय कामकाजात होणारा विलंब टाळून सर्व थकीत प्रकरणाचा निपटारा वेळेवर होण्यास मदत होणार असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन विभाग ) चंद्रकांत पवार यांनी सांगितले.

सोशल मिड्याच्या माध्यमातून मंत्रीमहोदयांचा आढावा

 महत्त्वाकांक्षी असणाऱ्या या उपक्रमाला ग्राम विकास विभागाच्या मंत्री पंकजा मुडे या स्वत या उपक्रमाचा राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचा आढावा सोशल मिड्याच्या माध्यमातून घेत आहेत.

अधिकारी घेत आहेत दैनंदिन आढावा

 जिल्हा परिषदेचे सर्व विभाग आणि पाच पंचायत समित्यामध्ये अभिलेख वर्गीकरणाच्या कामाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार हे  सातत्याने आढावा घेत असून उप मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्व विभागाचे अधिकारीही अभिलेख वर्गीकरणाच्या कामाबाबत दैनदिन आढावा घेत आहेत

२५ हजार फाईल्सचे अद्यावतीकरण

 अभियान काळात कार्यालयात असलेल्या अभिलेखाच्या एकूण एकूण १४ हजार ५५४ फाईल्स अभिलेख कक्षात पाठविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या असून यापूर्वी अभिलेख कक्षात असलेल्या व अभियान काळात तयार केलेल्या अशा एकूण २५ हजार फाईल्सचे अद्यावतीकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.