अभिनेते अनुपम खेर यांचं ट्विटर अकाउंट हॅक
ख्यातनाम अभिनेते अनुपम खेर यांचं ट्विटर अकाउंट हॅक केल्याची घटना घडली. अनुपम खेर यांनी याबाबतची माहिती भारतातील ट्विटरच्या मुख्यालयाला दिल्यानंतर त्यांचं अकाउंट सस्पेंड करण्यात आले.
अनुपम खेर यांचं अकाउंट तुर्कस्तानला हॅक झालं मात्र त्यांच्या अकाउंटवर ‘आय लव्ह पाकिस्तान’ सारखे ट्विट केले जात आहेत. हॅकर्सनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिलं की ‘तुमचं अकाउंट तुर्कस्तानातील सायबर आर्मी आइदिज तिमने हॅक केलं आहे. तुमचा सर्व महत्त्वाचा डेटा कॅप्चर करण्यात आला आहे.’ ट्विटच्या शेवटी हॅकर्सनी आय लव्ह पाकिस्तान लिहिलं आहे. हॅकर्सनी त्यानंतर अनुपम खेर यांच्या अकाउंटवर अनेक ट्विट केले आहे. सगळ्या ट्विटमध्ये ‘आय सपोर्ट तुर्की’ आणि ‘आय लव्ह पाकिस्तान’ लिहिलं आहे.
भारतातील ट्विटर अकाउंट हॅक होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. या आधीही अनेकदा सरकारी ट्विटर अकाउंट हॅक करून त्यावर पाकिस्ताच्या समर्थनार्थ ट्विट करण्यात आले आहेत.