अभिनेता सलमान खान व कलर्स वाहिनी विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद

( म विजय )

पुणे – सध्या चालू असलेल्या कलर्स वाहिनीवरील बिगबॉस या रिऍलिटी शोच्या सेटवर स्पर्धक जुबेर खानला शिवीगाळ केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान व कलर्स वाहिनी विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.हा प्रकार शनिवारी घडला.

या प्रकरणी चित्रपट निर्माता व दिग्दर्शक जुबेर अली खान (वय ३९, रा. न्यु म्हाडा बिल्डिंग, एस. एम. बी. पी रोड, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. खान यांच्या या तक्रारीवरुन सलमान व कलर वाहिनीच्या विरोधात भादंवी कलम 506, 34 अंर्तगत हा अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email