अभाविपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय महामंत्री श्री. आशिष चौहान ह्यांचे डोंबिवली नगरीत ढोल – ताशाच्या गजरात स्वागत
मंगळवार दि. १६ जानेवारी, अभाविपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय महामंत्री ह्यांच्या डोंबिवली प्रवासात त्यांनी विविध महाविद्यालयीन विद्यार्थी, अभाविप कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, महाविध्यालयांचे प्राचार्य, लोकप्रतिनिधी, पत्रकार बंधू ह्यांच्याशी संवाद साधला.
डोंबिवली मधील रॉयल कॉलेज, वंदेमातरम कॉलेज, मॉडेल कॉलेज या महाविद्यालयांत त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्यतिरिक्त इतर महाविद्यालयांच्या प्राचार्यान्सोबत संवाद आयोजित करण्यात आला.
सायंकाळी अभाविप डोंबिवली कार्यालयात फटाके आणि ढोल – ताशांच्या गजरात राष्ट्रीय महामंत्री श्री. आशिष चौहान आणि कोंकण प्रदेशमंत्री श्री. अनिकेत ओव्हाळ ह्यांचे औक्षण करून कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
या नंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ‘नवीन शिक्षण नीती’ (New Education Policy) ह्या विषयावर पत्रकारांशी संवाद साधला, विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डोंबिवली शहरातील अनेक मान्यवर, विविध संस्थांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयात उपस्थित होते.
अभाविप राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य मिहिर देसाई, जिल्हा संयोजक दर्शन बाबरे, अभाविप डोंबिवली शहरमंत्री स्वरदा वैद्य, अभाविप कल्याण शहरमंत्री सतीश चव्हाण उपस्थित होते.
▪कॉलेज वर भाषण – 3
▪प्राचार्यांसोबत संवाद – 4
▪पत्रकार परिषद
▪मान्यवर नागरिक, विवेकानंद केंद्र, जनकल्याण समिती, वनवासी कल्याण आश्रम, पूर्वांचल विकास, भा. ज. युवामोर्चा, ज्ञान प्रबोधिनी, इ. संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पूर्व कार्यकर्ते यांसोबत कार्यालयात संवाद.