अफगाणिस्तानात सहा भारतीयांचं व एक अफगाणीच अपहरण

अफगाणिस्तानच्या बागलान प्रांतात शस्त्रधारींनी सहा भारतीय आणि एका अफगाणी कर्मचाऱ्याचे अपहरण केलेल आहे. केईसी असे या भारतीय कंपनीचे नाव आहे. उत्तर अफगाणिस्तानमधील बागलान प्रांतातील ही घटना घटलेली आहे. हे सर्व जण एका मिनी बसमधून पॉवर प्लँटकडे जात होते. यावेळी अज्ञातांनी बंदुकीचा धाक दाखवला आणि बसचालकासह सर्वांचं अपहरण केलं, अशी माहिती बागलान पोलिसांचे प्रवक्ते जबीउल्लाह यांनी दिली आहे.

या अपहरणामागे तालिबानचा हात असल्याची शक्यता स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे. अद्याप या अपहरणाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. हे सर्व अभियंते ‘द अफगाणिस्तान ब्रेशना शेरकट’साठी काम करतात. ही कंपनी पॉवर स्टेशन बनवण्याचं काम करते.

अफगाणिस्तानमध्ये खंडणीसाठी अपहरणाच्या अनेक घटना घडतात. गरीबी आणि वाढती बेरोजगारी यामागचं प्रमुख कारण आहे. २०१६ साली देखील एका भारतीयाचं अपहरण करण्यात आलं होतं, ज्याची तब्बल ४० दिवसांनी सुटका झाली होती.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email