अफगाणिस्तानातील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधानांकडून निषेध
नवी दिल्ली, दि.०२ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानात काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.
पंतप्रधान म्हणाले, ‘अफगाणिस्तानात काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. अफगाणिस्तानच्या बहु-सांस्कृतिक रचनेवरील हा हल्ला आहे. पीडीत कुटुंबांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी मी प्रार्थना व्यक्त करतो. या दु:खद प्रसंगी अफगाणिस्तान सरकारला मदत करण्यासाठी भारत तयार आहे.’
Please follow and like us: