अपघात केल्याची थाप मारत विद्यार्थ्याला लुबाडले 

डोंबिवली – कल्याण पश्चिम आधारवाडी परिसरातील श्री कॉम्प्लेक्स मध्ये राहणारा राहुल नवाळे 19 हा विद्यार्थी काल दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास टिळक चौक येथे ट्युशनसाठी जात होता .यावेळी एक अज्ञात इसमाने त्याला हटकले त्याने माझ्या मुलीला धक्का मारून स्कुटर वरून खाली पाडल्याने ती जखमी झाली आहे धक्का मारणा-याने तुझ्या सारखे शर्ट घातले आहे मला ओळख पटवायची आहे तू माझ्या सोबत चल असे सांगत सदर अज्ञात इसम राहुलला नजीक च्या एम के शाळे जवळ शांताबाई जाधव चाळीत घेऊन गेला .तेथे गेल्या नंतर राहुल जवळून सोन्याची चैन घेऊन तो पसार झाला .आपली फसवणूक झाल्या चे लक्ष्यात आल्या नंतर राहुल ने या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थनाकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.