अपंग प्रमाणपत्र शिबीर संपन्न
अंबरनाथ- शिवसेना अपंग सहाय्य सेना कल्याण लोकसभा क्षेत्र अध्यक्ष रुग्णमित्र भरत खरे यांच्या पुढाकाराने अंबरनाथ रेल्वे स्थानक शेजारी परचुरे शास्त्री कुष्ठ वसाहत या ठिकाणी कुष्ठ पीडित बांधव यांना नगरपालिका अनुदान मिळावे या साठी लागणारे अपंग प्रमाणपत्र शिबीर आयोजित करण्यात आले होते .
या शिबिरात स्थानिक आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी उपस्थित राहून कुष्ठरोगी बांधव याना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच मध्यवर्ती रुग्णालयात डॉ अशोक नंदपूरकर यांना फोन वरून त्या रुग्णांना विनाविलंब अपंग दाखले देण्याची सूचना केली
शिबिरात वैधकीय अधिकारी डॉ कांबळे व त्यांच्या पथकाचे आणि स्थानिक कार्यकर्ते बाबू नायकोंडी ,सायबनणा कुडनूर यांचे सहकार्य लाभले.
Please follow and like us: