अनुसूचित जाती-जमातीचा निधी शेतकरी कर्जमाफीसाठी दिल्याविरोधात मोर्चा

ऋतूराज पाटिल  

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अनुसूचित जाती-जमातीचा निधी दिल्याचे सांगत त्याविरोधात आज कल्याणात मोर्चा काढण्यात आला. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून तहसिल कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला.

अनुसूचित जाती आणि जमातीतील कल्याणकारी योजनांचा 1 हजार कोटींची निधी शेतकरी कर्जमाफीसाठी मंजूर करण्यात आल्याचे सांगत हा निधी इतरत्र वळवणे म्हणजे एक प्रकारचा दरोडा असल्याचा आरोप आंबेडकरवादी अन्याय, अत्याचार, निर्मूलन समन्वय समितीने केला आहे. अनुसूचित जाती जमातीचा निधी इतरत्र वळवू नये आणि त्यासाठी कर्नाटक सरकारप्रमाणे कायदा करण्याची मागणीही यावेळी आंदोलकांनी केली. यासंदर्भात समन्वय समितीच्या शिष्ट मंडळाने तहसिलदारांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email