अनुदानित – विनाअनुदानित सिलेंडरचे दर वाढले

मुंबई – आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा भडका उडाला असताना आता अनुदानित व विनाअनुदानित सिलेंडरचे दर वाढले आहेत. देशभरातील ८१ टक्के कुटुंबं हे सिलेंडरचा वापर करतात. त्यामुळे या सिलेंडर दरवाढीचा फटका देशातील कोट्यवधी लोकांना बसणार आहे. अनुदानित सिलेंडरचा दर ४८ रुपयांनी, तर विनाअनुदानित सिलेंडरचा दर २ रुपये ३४ पैसे असा वधारला आहे.

देशभरात झालेल्या सिलेंडरच्या दर वाढीमुळे आता अनुदानित सिलेंडरसाठी मुंबईत ४९१.३१ रुपये मोजावे लागतील. तर राजधानी दिल्लीत अनुदानित सिलेंडरची किंमत ४९३.५५ रुपये इतकी होईल. याशिवाय अनुदानित सिलेंडरसाठी कोलकात्यात ४९६.६५ रुपये, चेन्नईत ४८१.८४ रुपये ग्राहकाला मोजावे लागतील. दुसरीकडे मुंबईत विनाअनुदानित सिलेंडरसाठी ४८.५० रुपये अधिक द्यावे लागतील. मुंबईत विनाअनुदानित सिलेंडर ६७१.५० रुपयांना मिळेल. तर विनाअनुदानित सिलेंडरसाठी दिल्लीत ६९८.५० रुपये, कोलकात्यात ७२३.५० रुपये, चेन्नईत ७१२.५० रुपये मोजण्याची तयारी ठेवावी लागेल.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email