अनधिकृत रिक्षा थांबा न हटता बसथांबा हटला ….

अनधिकृत रिक्षा थांबा न हटता बसथांबा हटला ….

डोंबिवली :- दि. २४ शहरातील अनधिकृत रिक्षा थांबे हा गंभीर विषय बनत चालला आहे. हे अनधिकृत रिक्षा थांबे हटवण्यास उपप्रादेशिक परिवहन विभागाला अपयश आले असताना परिवहन उपक्रमाने ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीवरून इंदिरा चौकातील नवीन बांधलेला बस थांबा हटवला. यामुळे परिवहन बसचालक आणि कर्मचारी नाराज झाले आहे.

     शिवसेनेचे डोंबिवली माजी शहरप्रमुख भाऊ चौधरी हे परिवहन समिती सभापती असताना काही महिन्यांपूर्वी इंदिरा चौकातील फुटपाथवर बसथांबा बांधण्यात आला होता. मात्र या बसथांब्यासमोर अनधिकृत रिक्षाथांबे असल्याने बस उभी करण्यास जागा मिळत नव्हती. काही नागरिकांनी येथील रिक्षा थांबा हटवण्यास वाहतूक पोलीसांकडे तोंडी तक्रारी केल्या होत्या. मात्र अनधिकृत रिक्षा थांब्यावर कारवाई उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून केली जाते असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. काही ज्येष्ठ नागरिकांनी या बसथांब्यावर आक्षेप करत परिवहन सेवेकडे तक्रार केली होती. याकडे गांभीर्याने लक्ष देत परिवहन सेवेने येथील बसथांबा हटवून पूर्वेकडील भोपर – देसलेपाडा प्रवेशद्वारा जवळ लावला आहे. यावर परिवहन बसचालक आणि कर्मचारी यांनी नाराजी व्यक्त करत येथील अनधिकृत रिक्षाथांबा हटवले आवश्यक आहे असे सांगितले. अनधिकृत रिक्षाथांबे आणि बेशिस्त रिक्षाचालक इंदिरा चौकात वाहतूक कोंडीला जबाबदार असून परिवहन बसेस उभी करण्यास जागा मिळत नसल्याकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे का लक्ष देत नाही असा प्रश्न डोंबिवलीकर विचारीत आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email