अनधिकृत माध्यमिक शाळांवर कारवाई
दि:१५ अनधिकृत माध्यमिक शाळांमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये तसेच प्रवेश घेतल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी ही त्या पालकांनची राहील असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी कळविले आहे. संबंधित संस्था चालकांनी त्यांच्या संस्थेमार्फत सुरु असलेल्या अनधिकृत माध्यमिक शाळा/वर्ग तात्काळ बंद करून तसे हमीपत्र शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद,ठाणे या कार्यालामध्ये सादर करावे असेही सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात मराठी माध्यमाच्या 4,हिंदी माध्यमाच्या 4 व इग्रंजी माध्यमाच्या 13 शाळा,अशा 21 शाळा आढळून आल्या आहे.
सन 2017-2018 मधील युडायस रिपोर्टनुसार ठाणे जिल्हा परिषद अतंर्गत खालीलप्रमाणे अनधिकृत माध्यमिक शाळा सुरु आहेत.
आदर्श विद्यालय,लोढा(मराठी ),निळजे,कल्याण/प्रशिक स्पेशल (मराठी) विद्यालय,मिरा-भाईदर/स्वामी समर्थ हायस्कूल (मराठी) वसार,भाल,अंबरनाथ/प्रगती विद्यामंदिर,(मराठी) चिखलोली अंबरनाथ/ आदर्श विद्यालय,लोढा(हिंदी ),निळजे,कल्याण/नालंदा (हिंदी) विद्यालय,ठाणे/आदर्सविद्यालय, सेकंडरी,(हिंदी) दिवा, ठाणे/अरुणज्योत विद्यालय,ठाणे/आदर्श विद्यालय,लोढा( इंग्रजी),निळजे,कल्याण./पोदार इंटरनॅशनल विद्यालय(CIE)उंबर्डे,केडीएमसी./भारतीय जागरण इंग्रजी सेकंडरी विद्यालय,कोपरखैराणे,नवीमुंबई./श्री.साईज्योती सेकंडरी विद्यालय कोपरखैराणे,नवीमुंबई./अल मुमिनाह सेकंडरी विद्यालय बेलापूर,नवी मुंबई./विद्या उत्कर्ष मंडळ इंग्रजी विद्यालय बेलापूर,नवी मुंबई./ज्ञानदिप सेवा मंडळ इग्रंजी सेकंडरी विद्यालय,करावे,नवी मुंबई./आरक्वॅाम इस्लामिक विद्यालय ठाणे./रफिक इंग्रजी विद्यालय,ठाणे./स्टार इग्रंजी विद्यालय,ठाणे./होली मारिया कॉन्व्हेंट इंग्रजी विद्यालय,ठाणे./नवभारत इंग्रजी विद्यालय,अंबरनाथ./आतमन अॅकडमी,ठाणे.
अनधिकृत शाळा तत्काळ बंध न केल्यस त्या संस्थाचालकाविरुद्ध बालकांचा मोफत व सक्तिच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमाच्या तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येल असे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,ठाणे यांनी प्रसिद्धीपत्रका मार्फत कळवले आहे.