अनधिकृत बॅनर पोस्टर लावणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल
श्रीराम कांदु
कल्यान : शहरात महापालिकेची विना परवानगी अनधिकृत पणे पोस्टर होर्डिंग लावल्या प्रकर्णी महापालिकेने खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखक केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी सनशाईन इन्स्टिट्यूट ,फ्लिस्ट प्ले ग्रुप,प्रहार अकेडमी या संस्था विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे अनधिकृत बॅनर होर्डिंग विरोधात कारवाई साठी कल्याण पश्चिमेकडील गोदरेज हील परिसरात पाहणी करत असताना विजेच्या खांबावर ,बॉक्स वर झाडांवर महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता सनशाईन इन्स्टिट्यूट ,फ्लिस्ट प्ले ग्रुप,प्रहार अकेडमी या संस्थानि पोस्टर बॅनर लावलेले आढळून आले .त्यामुळे शहराचे सौंदर्य हानी पोहचवून विद्रुपीकरण केल्याचा ठपका ठेवत या तीन संस्था विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे
Please follow and like us: