अनधिकृत बांधकाम प्रकरणी डोंबिवलीत “आई “बिल्डर्सवर अडीच कोटीच्या दंडाची कारवाई

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.१८ – जिल्हाधिका-यांच्या अखत्यारीतील भूखंडावर बांधकाम करण्यासाठी जिल्हाधिका-यांची परवानगी नसतानाही या जागेवर इमारतीचे आराखडे पालिकेच्या नगर रचना विभागाने मंजूर करत यात लाखोचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. दरम्यान याप्रकरणी जिल्हाधिका-यांच्या आदेशाने कल्याण तहसीलदारानी विकासकाला तब्बल २ कोटी ५२ लाख रुपयाचा दंड ठोठावल्याने या घटनेवर शिक्कामोर्तब झाले असून अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासकाबरोबरच या बांधकामांना अभय देणाऱ्या नगररचना विभागातील कर्मचारी अधिका-यांवर कारवाईच्या मागणीसाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा तक्रारदार भोईर यांनी दिला आहे.

डोंबिवली पूर्वेकडील आई अपार्टमेंट या जिल्हाधिका-यांच्या अखत्यारीतील भूखंडावर पूर्वीपासून रहिवासी घरे आहेत. मात्र सदरचा भूखंड विकसित करण्यासाठी जिल्हाधिका-यांची परवानगी न घेता तसेच जमिनीचा नजराणा न भरताच जिल्हाधिका-यांच्या परवानगी शिवाय या ठिकाणी इमारती उभारल्या आहेत. या तक्रारीत विकासकाने कोणत्याही नियमाचे पालन न करता आणि जिल्हाधिका-यांकडे इमारत बांधकामांसाठी परवानगी मागितल्याचे पत्र सादर करत महापालिकेच्या नगररचन विभागाकडून इमारतीचे आराखडे २०१३ मध्ये मंजूर करून घेतले असून यात मोठ्या प्रमणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. तसेच जिल्हाधीका-यांचा इमारत बांधकामासाठी ना हरकत दाखला मिळालेला नसतानाही या ठिकाणी इमारती बांधून त्याची विक्री केल्याचा प्रकार जिल्हाधिका-यांच्या निदर्शनास आणून दिल्यांनतर तक्रारदाराने तक्रार केलेल्या जमिनीचा मालक प्रकाश कर्णिक तसेच इमारतीचे विकासक संतोष बिडवे गौरव लिखिते, प्रवीण लीखिते यांना जिल्हाधिका-यांनी २ कोटी ५२ लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email