अनधिकृत नलजोडण्यावर कारवाई करण्यासाठीच्या पथकाला करावा लागतो शिवीगाळ व दगडफेकीचा सामना
अनधिकृत नलजोडण्यावर कारवाई करण्यासाठीच्या पथकाला करावा लागतो शिवीगाळ व दगडफेकीचा सामना
कल्याण : डोंबिवली पूर्वेपासून चार ते पाच किमीच्या अंतरावर असणार्या अंबरनाथ पाईप लाईन रोड वर औद्योगिक विकास महामंडळाची पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन आहे या नळजोडणी वरून अनेक ठिकाणी अनधिकृत पणे पाणी कनेक्शन दिले जात आहे .अशा अनधिकृत नलजोडण्यांवर कारवाई करन्यास जाणार्या औद्योगिक विकास महामंडळाच्या पथकाला स्थानिकांच्या शिवीगाळ दगडफेकीला सामोरे जावे लागत आहे .
डोंबिवली नजिक च्या अंबरनाथ पाईप लाईन नजीक मोठ्या प्रमाणात ढाबे, हॉटेल्स,सर्व्हिस सेंटर ,चाळी आहेत.याच ठिकाणाहून
असणार्या औद्योगिक विकास महामंडळाची पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन आहे.या पाईप लाईन वर अनेक ठिकाणी अनधिकृत पणे नलजोडण्या दिल्या आहेत.आशा अनधिकृत नळजोडण्याविरोधात कारवाईसाठी
औद्योगिक विकास महामंडळाने अनेकदा कारवाई केली ज्या नागरिकांनी किंवा ढाबे, हॉटेल्स,सर्व्हिस सेंटर चालकांनी आशा प्रकारे अनधिकृत ओने जोडन्या केल्या आहेत अशा विरोधात पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मात्र औद्योगिक विकास महामंडळाचे पथक कारवाई करत पुढे सरकतात पुन्हा नव्याने या जोडन्या केल्या जातात .अनेकदा या अनधिकृत नलजोडण्यांवर कारवाई साठी गेलेल्या पथकाला स्थानिकांकडून शिवीगाळ करत दगडफेक करन्यात आल्याचा घटना ही घडू लागल्याने या कर्मचार्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.