अतुल्य भारत मासिक व्याख्यानमालेचं आयोजन
शनिवार २८ एप्रिल रोजी प्रथम पुष्प
ध्रुव नॉलेज सोसायटीच्या वतीने अतुल्य भारत प्राचीन भारताचे वस्तुनिष्ठ विश्लेषण या मासिक व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आले आहे.यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील १२ वक्त्याची १२ व्याख्याने तसेच १२ तज्ञांंच्या १२ कार्यशाळा संपन्न होणार असून याचे पाहिले पुष्प शनिवार दिनांक २८ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता कल्याण येथील मेट्रो मॉलमधील बॉलरुम पेलाझ्झो येथे आयोजित करण्यात आले आहे.यात माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचं व्याख्यान होणार असून हा कार्यक्रम विनामुल्य आहे.परंतु यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून त्यासाठी ९८१९७७३९७० /७७३८५३५४७२ या क्रमांकांंवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Please follow and like us: