अट्टल चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या ३ बंदुका, १७ काडतुसे जप्त

गुन्हे शाखा 9 च्या सपोनि इरफान शेख यांची उत्तम कामगिरी

(म.विजय)

मुंबई – मुंबई गुन्हे शाखा – ९ च्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या उत्तम कामगिरीमुळे २ अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेेले २ चोरट्यांकडून ३ बंदुका व १७ जिवंत काडतुसांसह १८ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चोरट्यांना २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, त्या दृष्टीकोनातून तपास सुरू आहे.
गुन्हे शाखा – ९ च्या पथकात कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक इरफान शेख यांना बंदुका विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली २० मे रोजी खार पश्चिम परिसरातील एएटी मॉलसमोर पोलिसांनी सापळला लावला. त्यावेळी तेथे एक कार आली. पोलिसांनी सदर कार अडवून कारमधील २ जणांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २ बंदुका व १२ जिवंत काडतुसा, २ मोबाईल, सोने-चांदीचे दागिने व २ लाख १० हजार रुपयांची रोकड असा एकूण १८ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
जप्त केलेला मुद्देमाल गुजरात राज्यातील बोताड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची माहिती धर्मेश ऊर्फ डीके पप्पू सिंग (२८) व राजेंद्र पाटील (३२) यांनी दिली. या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ नुसार गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली.
दरम्यान, पोलीस कोठडीदरम्यान दोघांची कसून चौकशी केली असता धर्मेंश याने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या राहत्या घरातून आणखी एक बंदूक व ५ जिवंत काडतुसा पोलिसांनी जप्त केल्या. धर्मेश सिंग हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्या विरुद्ध नालासोपारा, पालघर येथे खुनाचे गुन्हे तर भिवंडी पोलीस ठाण्यात मोटार वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदर गुन्हा गुन्हे शाखा – ९ चे प्रभारी वपोनि महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि आशा कोरके, पोनि अरुण सावंत, सपोनि इरफान शेख, सपोनि शरद धराडे, पोउनि कोरे, पोउनि बनसोडे, हवालदार शिर्के, जाधव, गावकर, झोडगे, पोना सावंत, पाटील, शेख, वारंगे, पेडणेकर, हाक्के, पोशि पाटील, पवार आदी पोलीस पथकाने उत्तमरीत्या उघडकीस आणला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email